Total Pageviews

Tuesday, July 20, 2010

***** नावात काय आहे *****

१ . नावात काय आहे
ओठांत साय आहे
‘ नाही ‘ जरी म्हणाली
पाऊस ‘ होय ‘ आहे …
……… .
२ . गर्रम गर्रम भजी
गारेगार पाऊस
गर्रम गर्रम चाय
हाय ! हम भी आदमी थे कुछ काम के …

३ . पावसाच्या डोळ्यांत पाप
वेलांट्या शोधत
वळणा – वळणानं
चालला आहे साप
भिजत तुझ्या मागोमाग …

४ . मेघदूत म्हणतो कालिदासाला :
टी ए – डी ए दे मला
नाही तर मोबाइल लाव तिला -

५ . गो , पावस काय बगीत बसलंस ?
तो काय तुजो घो असा काय ?
- ईस बाय ss !

६ . गो , घरात तू आनि मी फक्त

नि भाय्र ह्या पावसाचा धुमशान
तुज्या डोळ्यात …
किती हे काळे काजळाचे ढग
काय आज तुजो इच्यार काय ?
- ईस बाय ss !

७ . काल पाऊस नव्हता
आज पाऊस नाही
उद्या पाऊस नसेल
पर्वा पाऊस नसेल
पांढऱ्या ढगांनो ,
थोडे तरी निग्रो व्हा .

८ . पाऊस संपूर्ण थांबल्यावरही
अधुन – मधून ठिबकत राहिला
खूप वेळ ….
शेवटचे हुंदके देत राहिला …!

९ . पाऊस थांबलाय
संसार वाहून गेलाय
राजा बसलाय दडून
प्रजा घेतेय रडून
मूर्ख वाचतोय कविता
मीडिया मारतोय बाता

- ऐसे बडे बडे शहरो में
बारिश के छोटे – मोठे हादसे
होते रहते हैं

No comments:

Post a Comment