Total Pageviews

Thursday, December 15, 2011

आठवतात का ते क्षण तुला?

आठवतात का ते क्षण तुला?
किती सहज विचारले होतेस आवडते का मी तुला?
खूप विश्वासाने दिला होता होकार तुला.....
कारण वाटले नव्ह्ते कधी सोडुन जाशील मधेच मला.
आठवतात का ते क्षण तुला?
किनार्‍यावर वाळूत खेळताना,वाळूत आपली नावे लिहिताना,
आलेल्या लाटेने फक्त माझेच नाव पुसल्याचे जाणवले होते मला.
वाटले नव्ह्ते कधी सोडुन जाशील मधेच मला
आठवतात का ते क्षण तुला?
एकत्र प्रेमाच्या आणाभाका खाताना ,शेवट पर्यंत साथ देण्याचं वचन देताना
का कुणास ठावूक पण आभाळ भरुन आल्याचं आठवय मला.
वाटले नव्ह्ते कधी सोडुन जाशील मधेच मला
आठवतात का ते क्षण तुला?
किती अवघडली होतीस लग्नात माझी ओळख करुन देताना,
पण तेव्हा मात्र धुसर दिसत होतं सगळचं मला....
वाटले नव्ह्ते..............

No comments:

Post a Comment