Total Pageviews

Monday, December 19, 2011






आज फार स्वताला एकटा समजतोय
आताच एक मुलगी पाहीली फार सुंदर होती
हो ती पण एका मुलाच्या बाईक मागे बसुन होती
मुलाला मी चांगलाच ओळखतो BEER,CIGARATE
त्याच्या सोबत मुलींचे नाद त्याला
तरीही जाउदे मी नाय पीत BEER,CIGARATE कसलेच नाद नाही
तरीही माझ्या नशीबी Girlfriend नाही.....!!

Thursday, December 15, 2011

मैत्रिण..


चारोळ्या

तिच्याशी भांडताना नकळत,
मीच नकळत तिच्या बाजूनी होतो!
तिच्या गालचे अश्रू पुसत,
रागच माझा फितूर होत !!
माणुसच आज माणसाला मारायला उठलायं,
हा कोणता नवां धर्म माणसाने स्विकारलाय?
हे माणसा परतून माणसात ये,
सोडून द्वेश, हर्षात ये!
तस पाहिलं तर,
तिची माझी सच्ची मैत्री होती..
आज कित्येक वर्षानी भेटलो,
माझी सारखीच तिही कोणा एकासाठी एकटी होती !!
सोबतीस नाही माझ्या कोणी
तरी जगणं न मी सोडलं...
बदलत राहिले दिवस तरीही,
खापर त्याचे नशिबाच्या माथ्यावरं नाही मी फोडलं !!
शब्द मोत्यांसारखे असतात
म्हणून कसेही माळायचे नसतात....
शब्दांच्या ओळी होतांना,
शब्दांचे अर्थ सांडायचे नसतात!!

मी पाहिलय तुला
मला सोडुन् जाताना....
स्वत:च्या डोल्यातुन
तुला वाह्ताना.....

स्वतःच्या परिनं जिवन जगण्याची
इथे प्रत्येकास संधी नसते
प्रत्येक झाडाच्या नियती
हिरवीगार फांदी नसते
नदीकाठी माझं घर
प्रत्येकाचा आरडा ओरडा आहे
कसं सांगू मी त्यांना,
माझा घसा किती कोरडा आहे

पापाचा घडा भरला आहे पण,
निर्वाणीचा दूर आहे तो क्षण,
देवंही आता गप्प बसलाय,
नऊ अवतारां नंतर धास्तावलाय !!!!
समाजाला काही,
स्त्री पुरूष समानता रुजली नाही,
रामाच्याही सीतेला
अग्नी परीक्षा चुकली नाही!!!!
बुडल्यावर दुःखात,
माणसांची पाठ फिरली.
माणूसच काय .... पण अंधारात
सावलीनेही साथ सोडली.


देवाला देवत्व देतो
त्याचे विसर्जनहि करतो
एवढा महान माणूस
कधीकधी आत्महत्याहि करतो

भावना अन् वस्तुस्थिती
यात छोटी गफलत असते,
मनाच्या प्रांगणात
भावनाच वस्तुस्थिति असते.

हरलेला डाव ऱागाने पुन्हा मांडू नये
खेळण्यांनी खेळण्यांशी हें असें भांडू नये
सोसतांना ती कशी तृप्तीत सोसावी व्यथा
आसवांची बात न्यारी, पण स्व:ता सांडू नये

आठवतात का ते क्षण तुला?

आठवतात का ते क्षण तुला?
किती सहज विचारले होतेस आवडते का मी तुला?
खूप विश्वासाने दिला होता होकार तुला.....
कारण वाटले नव्ह्ते कधी सोडुन जाशील मधेच मला.
आठवतात का ते क्षण तुला?
किनार्‍यावर वाळूत खेळताना,वाळूत आपली नावे लिहिताना,
आलेल्या लाटेने फक्त माझेच नाव पुसल्याचे जाणवले होते मला.
वाटले नव्ह्ते कधी सोडुन जाशील मधेच मला
आठवतात का ते क्षण तुला?
एकत्र प्रेमाच्या आणाभाका खाताना ,शेवट पर्यंत साथ देण्याचं वचन देताना
का कुणास ठावूक पण आभाळ भरुन आल्याचं आठवय मला.
वाटले नव्ह्ते कधी सोडुन जाशील मधेच मला
आठवतात का ते क्षण तुला?
किती अवघडली होतीस लग्नात माझी ओळख करुन देताना,
पण तेव्हा मात्र धुसर दिसत होतं सगळचं मला....
वाटले नव्ह्ते..............

पटकन "सॉरी' म्हणायला शिका; "इगो' सोडून द्या**

पटकन "सॉरी' म्हणायला शिका;
"इगो' सोडून द्या**

दोन भिन्न व्यक्ती, भिन्न वातावरणात वाढलेल्या, त्यांच्या आवडीनिवडी,
सवयीही
वेगवेगळ्या; पण दोन-तीन भेटींतच सगळे आयुष्य एकत्र घालवायचा निर्णय घेतात.
मग
आनंदी व उत्साही वातावरणात, अखंड प्रेमात बुडालेले ते दोन जीव लग्नाच्या
बंधनात
बांधले जातात. "ऍरेंज्ड्‌ मॅरेज' असो वा "लव्ह मॅरेज'; दोघे ओळखीचे असोत
की
अनोळखी, जेव्हा ते सतत एकमेकांबरोबर असतात, तेव्हाच खरी ओळख होते.
लग्नानंतर
नवीन नाती, नवीन माणसे या सगळ्या नव्या नवलाईत पहिली काही वर्षे भुर्रकन
उडून
जातत; पण हाच काळ खूप महत्त्वाचा असतो. एकमेकांना समजून घेण्यासाठी. अगदी
छोट्या छोट्या सवयींपासून स्वभावापर्यंत सगळे हळूहळू उलगडत जाते. एकमेकांचे
सूर
जुळतात. संसाराचा पाया तयार होतो. एक अतूट नाते तयार होते. समोरची व्यक्ती
ही
आपली आहे, ती जशी आहे, तशी (गुण-दोषांसकट) तिला स्वीकारता आले पाहिजे.
लग्नानंतर एक-दोन वर्षे नवलाई टिकून असते. मग दोघांच्याही नकळत बदल घडतात.
ही
तीच व्यक्ती आहे का, अशा प्रश्‍न पडावा इतपत बदल घडतात! का परिस्थिती
बदलते?
नेमके काय होते कुणास ठाऊक! तिच्याशी बोलण्यास, भेटण्यास कायम तत्पर
असणारा
"तो' अचानक बिझी होतो. तिचा फोन येताच, "घरी यायला उशीर होणार आह,' किंवा
"पाच
मिनिटांनी फोन कर' इत्यादी सांगतो. तिच्यासाठी वाट्टेल तेवढे महागाचे
गिफ्ट
घ्यायला, तिला सरप्राईज द्यायला आतूर असलेला "तो' तिच्याबरोबर जाताना आधी
पाकीट
तपासून पाहतो. "ती'सुद्धा काही कमी नसते. त्याचासाठी नवनवीन पदार्थ
बनवणारी
"ती' आता त्यालाच फोन करून सांगते "येताना पार्सल घेऊन ये' किंवा "पोहे
खाशील
का?' "घरी कधी येणार?' "कुठे आहेस?' इत्यादी. नेमके काय झालेले असते? इतका
बदल
कशामुळे झालेला असतो? उत्तर सोपे आहे ः जबाबदाऱ्या वाढल्या की
प्रायॉरिटीज्‌ही
बदलतात. संसार म्हटले की, "भांडण' आलेच; पण रागात कोणी काही बोलले तर ते
सोडून
देता आले पाहिजे. "म
ी, माझे, माझी माणसे' हे सगळे गळून पडले पाहिजे व आपुलकीची भावना निर्माण
झाली
पाहिजे. अर्थातच यात दोघांचाही समप्रमाणात सहभाग असेल तरच हे शक्‍य आहे.
संसार सुखी करायचा असेल तर

1) एकमेकांबद्दल प्रेम, विश्‍वास आदर बाळगा

2) समोरच्याने बदलण्याची अपेक्षा न धरता स्वतःत बदल घडवा

3)ज्या दिवशी भांडण होईल, "त्याच' दिवशी मिटवा (अबोला धरू नका). बोलून
विचार
करण्यापेक्षा विचार करून बोला.

4) एकमेकांना वेळ द्या (दोघेच फिरायला जा. गप्पा मारा.)


5) पटकन "सॉरी' म्हणायला शिका व "इगो' सोडा (पुरुषीपणाचा, स्त्रीत्वाचा,
पैशाचा, पदाचा इत्यादी)

6) प्रेम आहेच; पण ते व्यक्त करणेही खूप गरजेचे असते. छोट्या-मठ्या

प्रसंगांमधून काळजी, आधार, कौतुक, प्रेम हे भाव व्यक्त होऊ द्या (उदाहरणार्थ

आय लव्ह यू, तू आज छान दिसतोस, किती दमलीस तू...इत्यादी)

संसार सुखी असेल तर घरात सुख-समाधान व शांती नांदेल. मग दिवसभर कुठेही
असा;
संध्याकाळी सगळ्यांनाच घरी परतण्याची ओढ असेल; पण तरीही वाढत्या
जबाबदाऱ्यांचे
व कामामुळे येणाऱ्या तणावांचे पडसाद आपल्या व्यक्तींवर उमटणारच. कधीतरी
वाद
होणारच; पण त्यांचे प्रमाण असेल "जेवणातल्या
मिठाएवढेच!'*

Wednesday, December 14, 2011

का कळेना.... मुंबई पुणे मुंबई

का कळेना कोणत्या क्षणी हरवते मन कसे
उमलती कश्या धुंद भावना अल्लग वाटे कसे
बंध जुळती हे प्रीतीचे
गोड नाते हे जन्मांतरीचे......

एक मी एक तू
शब्द मी गीत तू
आकाश तू , आभास तू , साऱ्यात तू........
ध्यास मी श्वास तू
स्पर्श मी मोहोर तू
स्वप्नात तू, सत्यात तू, साऱ्यात तू.....

पंख लाऊनी उडत चालले मन हे तुझ्या सवे
तुझा मी माझी तू कधी केव्हा कसे जुळले बंध हे
अबोल प्रीत हि हे नाते नवे
अजब रीत हि हे स्वप्न नवे.........

या भोवताली काही दिसेना
तू आणि मी, मी आणि तू बाकी उरेना,
हो तो कुठे अन आलोत कोठे
रस्ता कुठे जाई कसा काही कळेना

का कळेना कोणत्या क्षणी हरवते मन कसे
उमलती कश्या धुंद भावना अल्लग वाटे कसे
बंध जुळती हे प्रीतीचे
गोड नाते हे जन्मांतरीचे........

                                           .............................. i love you