Total Pageviews

Thursday, November 24, 2011

अ-वीस्मरणीय क्षण


जीवन असच जगायच असत. .
«
थोड दु:ख, थोड सुख
झेलायच असत,
कळी सारख सुंदर फुलात
उमलायच असत,
जीवन असच जगायच असत.
.
वार्यासंगे भीरभीरायच असत,
उन्हासंगे तळपायच असत,
पावसासंगे बरसायच असत,
जीवन असच जगायच असत.
.
अत्तरासंगे दरवळायच असत.
भुग्यासोबत गुणगुणायच असत,
जीवन असच जगायच असत.
.
फुलपाखरसंगे फिरायच असत,
सप्त रंगात डुबायच असत,
जीवन असच जगायच असत.
.
भुतकाळासंगे आठवायच असत.
वर्तमानासंगे खुलायच असत,
जीवन असच जगायच असत.
.
दु;खाला जवळ करुन भवीष्यकाळ
घडवायचा असतो.
जीवन असच जगायच असत.

No comments:

Post a Comment